अमृतेश्वर

                      अमृतेश्वर मंदिर, रतनवाडी

अमृतेश्वर मंदिर, रतनवाडीचे १८८० मधील चित्र
अमृतेश्वर मंदिर, रतनवाडीचे सध्याचे छायाचित्र
हेमाडपंती स्थापत्यशैलीचे पुरातन अमृतेश्वर मंदिर रतनवाडी गावात आहे. हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे.

मंदिराची रचना

मंदिराच्या गर्भगृहाला मागच्या बाजूला एक अर्धमंडप आहे. पुढे एक मंडप, अंतराळ व गर्भगृह असा या मंदिराचा तलविन्यास आहे. [१]मंदिराच्या रचनेत खाली थरयुक्त चौरस तळखडा असून वर नक्षीकामाने सुशोभित असे चौरसाकृती खांब आहेत. या खांबांचा वरचा भाग अष्टकोनी असून त्यावर वर्तुळाकृती आहेत. अगदी वरती कीचकहस्त आहेत. मंडपाचे छत घुमटाकार असून त्यावर ठरावीक अंतर सोडून नर्तक व वादकांच्या तिरप्या प्रतिमा आहेत. मंदिराचे शिखर भूमिज प्रकारचे असून शिखरावर चारही बाजूंनी एक एक अशा चार वेली आहेत.

राष्ट्रीय संरक्षित स्मारक

या मंदिराला ४ मार्चइ.स. १९०९ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.[२]

संदर्भ

  1. वर उडी मारा हेन्री कझिन्स (इ.स. १९१३). मेडिईव्हल टेम्पल्स ऑफ दि दख्खन. कॉस्मो पब्लिकेशन्स. (इंग्लिश मजकूर) 
  2. वर उडी मारा नोटिफिकेशन ऑफ सेंट्रली प्रोटेक्टेड मॉन्युमेन्ट्स इन इंडिया. आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, औरंगाबाद सर्कल. २२ जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)

चित्रदालन

No comments:

Post a Comment